तळेरेतील अर्णव पिसेला ‘नीट’ वैद्यकिय प्रवेशपुर्व परीक्षेत ७२०पैकी ६५०गुण

तळेरेतील अर्णव पिसेला ‘नीट’ वैद्यकिय प्रवेशपुर्व परीक्षेत ७२०पैकी ६५०गुण

कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून अर्णवचा सत्कार

तळेरे

तळेरे येथील प्रसिद्ध डॉ.सुहास पिसे आणि डॉ.निलिमा पिसे यांचा मुलगा कु.अर्णव सुहास पिसे याने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या NEET या परिक्षेत ७२० पैकी ६५० गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. कु.अर्णव पिसे याने आपल्या यशामध्ये आपल्या आई व बाबांना श्रेय दिले. कु. अर्णवचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कणकवलीतील सेंट येथील शाळेत झाले आहे.
त्याला 12 वी विज्ञान शाखेत 91 % गुण मिळाले होते.तर इयत्ता 10 वी च्या बोर्ड परिक्षेत 96 % गुण मिळाले होते.
कु.अर्णव याने कणकवली येथील सेंट उर्सूला या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता 10 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे 11 वी 12 वी कोल्हापुर येथे संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे मध्ये शिकत होता. अर्णवला मार्गदर्शन करणा-या सर्व शिक्षकांचे त्याचे वडील डॉ.
सुहास पिसे यांनी आभार व्यक्त केले. त्याच्या या यशात वैद्यकीय व्यवसायातील असलेल्या आई वडिलांचाही मोठा वाटा आहे. याशिवाय अर्णव हा कॅरम खेळातील उत्कृष्ट खेळाडू असून त्यांने यापुर्वी जिल्हा, विभागासह, राज्यस्तरावरील अनेक कॅरम स्पर्धेत यश संपादन केले आहे.

शिक्षक संघटनेकडून विशेष कौतुक
कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी अर्णव पिसे याच्या घरी जाऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कु.अर्णव पिसे यांचा आदर्श घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी NEET मध्ये यश संपादित करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता नाम. राणेंचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले आहे. शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरु होईल. मात्र या महाविद्यालयातून आपल्या जिल्ह्यातील मुलं डॉक्टर व्हायला पाहिजेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NEET या परीक्षेसाठी तयारी करून घेण्यासाठी चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक इन्स्टिट्यूट झाल्या पाहिजेत अशी भावना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी सत्कारप्रसंगी व्यक्त केली. अर्णवच्या या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा