You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी स्थापत्य अभियंता अमोल जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष .राजसाहेब ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या आदेशांनुसार रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष योगेश परूळेकर, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम, सरचिटणीस विजयभाई जाधव,उपाध्यक्ष अमित शिंदे यांचेकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत रचनात्मक कार्ये व लोकहिताचे सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे अमोल जंगले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 7 =