You are currently viewing राज्यस्तरीय ‘क्रिडारत्न’ पुरस्काराने संदेश तुळसणकर सन्मानित

राज्यस्तरीय ‘क्रिडारत्न’ पुरस्काराने संदेश तुळसणकर सन्मानित

वैभववाडी तालुका व्यापारी संघटना व वैभववाडी तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तुळसणकर यांचे करण्यात आले अभिनंदन

वैभववाडी

महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी चे क्रीडा शिक्षक संदेश तात्या तुळसणकर यांना राज्यस्तरीय ‘क्रीडारत्न नागरी पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.खा. राजु शेट्टी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


जयसिंगपूर येथे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजु शेट्टी, बिग्रेडीयर सुधीर सावंत, शिरोळ विधानसभा आमदार उल्हास पाटील, शे.का.प. विभागीय चिटणीस विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


संदेश तुळसणकर यांना मिळालेल्या या ‘क्रीडारत्न’ पुरस्काराबद्दल वैभववाडी‌ तालुका व्यापारी मंडळ, व वैभववाडी तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक नादकर सर, वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा