You are currently viewing कारिवडे-पेडवेवाडी येथील आशा सेविका लक्ष्मी परब यांचे निधन

कारिवडे-पेडवेवाडी येथील आशा सेविका लक्ष्मी परब यांचे निधन

सावंतवाडी

कारिवडे-पेडवेवाडी येथील आशा सेविका सौ. लक्ष्मी कृष्णा परब (३६ ) यांचे गुरुवारी मध्यरात्री गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळीच त्यांना येथील सावंतवाडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आशा सेविका म्हणून विनम्र व प्रामाणिकपणे सेवा केलेल्या लक्ष्मी परब यांच्या आकस्मित निधनाचा सर्वांनाच धक्का बसला आहे. कोरोना काळातही त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गावात चांगली सेवा दिली होती. त्यांच्या निधनाचे सकाळी वृत्त समजताच कारीवडे गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासु, दिर, जाऊ, भावजय असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा