You are currently viewing आमचा रंगबिरंगी पोपट

आमचा रंगबिरंगी पोपट

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*आमचा रंगबिरंगी पोपट*

माझ्या घरात आहे
रंगबिरंगी पोपट,
पिंजऱ्यात बसून तो
करी आदळआपट…।१।

लाल आहे चोच त्याची
हिरवे आहेत पंख,
आवाज असा काढतो
जसा वाजविला शंख..।२।

येणाऱ्याचे स्वागत व
जाणाऱ्यास निरोपही
गाणे गातो कधी कधी
कधी बसतो चुपचाप ही…।३।

उडता येत नाही तरी
मारतो कधी भरारी,
अवकाशात जायची
करतो सदा तयारी…।४।

वरून दिसतो शांत
डोके मात्र तापलेले,
उडायला बघतो पण
पंख त्याचे कापलेले…।५।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + 10 =