You are currently viewing वेंगुर्लेत विश्व हिंदू परिषदेच्या “हिंदू हितचिंतक अभियानाचा” शुभारंभ 

वेंगुर्लेत विश्व हिंदू परिषदेच्या “हिंदू हितचिंतक अभियानाचा” शुभारंभ 

वेंगुर्ले :

 

विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या शुभहस्ते विठ्ठल मंदिर, वेंगुर्ले येथे वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत करण्यात आला. यावेळी श्री. देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र परब यांच्या हस्ते सावळाराम कुर्ले बुवांचा पंढरपुरची अखंड वारी करीत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

संपूर्ण देशभर विश्व हिंदू परिषदेने ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत ” *हिंदू हितचिंतक अभियान* ” आयोजित केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंढरपुरची कार्तिकी वारी करुन आलेल्या वारकरयांचा सन्मान विश्व हिंदू परिषद, प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला.

विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णु खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर गुरुजींनी हिंदुंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ले प्रखंड प्रमुख अरुण गोगटे, प्रखंड मंत्री आप्पा धोंड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक बाबुराव खवणेकर, कार्यवाह मंदारजी बागलकर, बजरंग दलाचे भुषण पेठे, भाजपचे शरद चव्हाण, प्रसंन्ना देसाई, वि. ही.प.चे महादेव (भाऊ) केरकर, महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर, रा.स्व.संघाचे विजय वाडकर , *हिंदुधर्माभिमानी* — स्मिता मांजरेकर, मृण्मयी केरकर, प्रीती चव्हाण, शालीनी चीपकर, स्वप्नाली धोंड, ओंकार चव्हाण, *वारकरी संप्रदायाचे* – किशोर रेवणकर, गजानन कुबल, दिगंबर कुबल, रघुवीर पेडणेकर, रमाबाई तांडेल, शारदा तांडेल, प्रमीला टाककर, सहदेव गिरप, दिपाली कुबल, चित्रा केरकर, देवयानी केरकर, दाजी सावंत , सहदेव गिरप, सुजाता भुते , सावित्री तारी, अश्विनी गिरप, सुगंधा बांदेकर, चंदन कुर्ले, पांडुरंग मोंडकर, शामसुंदर रेवणकर, विठ्ठल वेंगुर्लेकर, अपर्णा सातार्डेकर, चंद्रभागा मेस्त्री, संध्या भोगवेकर, शाम आरोलकर, अंकुश वराडकर, दुर्गा कुबल, लक्ष्मी तांडेल, बाबली राऊळ, शुभांगी केळुसकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा