You are currently viewing सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश पाटील यांना ‘लाडली मीडिया अँड अडव्हर्टाझिंग अवॉर्ड फॉर सेन्सिव्हीटी’ पुरस्कार प्राप्त

सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश पाटील यांना ‘लाडली मीडिया अँड अडव्हर्टाझिंग अवॉर्ड फॉर सेन्सिव्हीटी’ पुरस्कार प्राप्त

सावंतवाडी :

 

सावंतवाडीचे सुपुत्र ऋषिकेश नंदकुमार पाटील यांना उत्कृष्ट व संवेदनशील पत्रकारितेसाठी महत्वाचा १२ वा “लाडली मिडिया अँड अडव्हर्टाझिंग अवार्ड फाॅर जेंडर सेन्सिव्हीटी” पुरस्कार प्राप्त झाला आहे.

युनायटेड नेशन्स पाॅप्युलेशन फंड यांनी स्पाॅन्सर केला होता. हा कार्यक्रम हैदराबाद येथे विश्व विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. तो सध्या इन्डी जर्नलला फ्रि लान्स पत्रकारिता करतो. तसेच हिंदुचे संस्थापक पी. साईनाथ यांच्या वेब पोर्टलला लेखन केले आहे. त्याने कोयना परिसर लॅंड स्लाईड झालेल्या भागात तसेच कोल्हापुर पूरग्रस्त भागात तसेच दिल्लीचे शेतकरी आंदोलन येथे प्रत्यक्ष काम करुन रिपोर्ट केले आहेत.

किसान आंदोलनात जाताना आदिवासी महिलांसोबत प्रवास करत, आदिवासी महिला शेतमजूर कस्तुरबा सरोले यांच्या जीवनावर इंडी जर्नल या पोर्टल साठी स्टोरी लिहिली व त्यासाठीच हा पुरस्कार मिळाला आहे. ऋषिकेश हा अभिनेते नंदू पाटील आणि डॉ. विजयालक्ष्मी चिंडक-पाटील यांचा सुपुत्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा