You are currently viewing सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा- सुषमा भट

सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा- सुषमा भट

आपल्या आजच्या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा आहेत सुषमा भट.

त्या इनरव्हिल क्लब ठाणे हिल्स शाखेच्या अध्यक्ष आहेत. भारतीय विमा कंपनीमध्ये नोकरी करत वैयक्तिक पातळीवर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या. या कार्याची दखल घेऊन २००१साली New Women या मासिकाने त्यांचाUnsung Women of the Millianium म्हणून गौरव केला. त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेऊन पूर्णवेळ सामाजिक कार्याला वाहून घेतले. अंकूर फाउंडेशन ही संस्था स्थापन करुन वैयक्तिक पातळीवर महिलांना त्या कुटिरोद्योगासाठी मदत करतात, आर्थिक दुर्बल मुलांना त्या शैक्षणिक मदत करतात. सुषमाताई म्हणतात, समाजसेवा ही शिकुन शिकवून केली जात नाही, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, घरच्या वातावरणाचा आपल्यावर होणारा साधक बाधक परिणाम आपल्याला आपली दिशा ठरवून देतात. दुसऱ्याला मदत करण्याची सवय, इच्छा आईबाबाकडे पाहून त्यांना मिळाली असे सुषमा भट म्हणतात. त्यांच्या आई गरीबघरातील महिलांना विणकाम, शिवणकाम विनामूल्य शिकवत. बाबा मुलांना फिटनेस व मनोबल वाढविण्यासाठी रोज दोन तास विनामूल्य देत.  हे लहानपणी त्यांनी पाहिलय आणि त्यांच्या कडे पाहून त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली. काँलेजमधे असताना एन.एस.एस. च्या अँक्टिव्हिटी म्हणून अनाथ मुलांना शिकवणे, वृध्दाश्रमात वृध्दांची सेवा करणे त्यांनी आनंदाने केल. गरीबी मुलांना योग्य शिक्षण मिळाव,
मार्गदर्शन मिळाव म्हणून त्या सतत कार्यरत राहिल्या. इनरव्हिल मधे गेले कित्येक वर्ष त्या काम करतात. सद्या त्या इनरव्हिल संस्थेच्या माजी प्रेसिडेंट म्हणून काम पहातात. त्याव्यतिरिक्त एका सामाजिक संस्थेतील अत्याचार ग्रस्त महिलांना उपजिवीकेच साधन मिळाव म्हणून सुषमाताईं मकाऊ बुकस् या इंटरनँशनल बुक ची अनेक शाळांमधे एक्झिबिशनस् आयोजित करतात. त्यामधे या महिलांना प्रशिक्षण देऊन काम उपलब्ध करून देतात. गृहिणींना घरबसल्या काम मिळवून देणे, ग्रामीण भागातील मुलांना मार्गदर्शन, मदत करणे, कुटिरोद्योग सुरु करण्यासाठी मदत करणे अशा प्रकारे त्या सामाजिक कार्य करतात. पैसे कसे कमवायचे हे शिकवणे, पैसे उचलून देण्यापेक्षा खूप मोलाच असत अस त्या म्हणतात. स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल आवाज उठवण्याचे काम सुरु केले आहे. कॉलेजमध्ये, रहिवासी संकुलामध्ये शिबीर घेऊन जनजागर करण्याचा उपक्रम राबविण्याचा त्या प्रयत्न करतात. करोनाच्या काळामध्ये उदासिनता, अस्वस्थता आल्यावर कोणाशीतरी मनमोकळ बोलाव, उपाय समजून घ्यावे अस वाटणा-या महिलांना त्या दिलासा देतात, समुपदेशन करतात.
इनरव्हिल क्लबतर्फे विविध कार्यक्रम राबविताना त्यांचा नेहमी पुढाकार घेत असतात. यामध्ये जेष्ठ नागरिकांची काळजी, आरोग्य आणि स्वच्छता, अनाथाश्रम, वृध्दाश्रम, दिव्यांग बालके, स्त्रीसक्षमीकरण, अन्याय अत्याचाराविरुध्द आवाज उठवणे, पर्यावरण दक्षता अशा अनेक सामाजिक कार्यात त्या नेहमीच पुढाकार घेतात.
अशा या चतुरस्र सामाजिक कार्यकर्त्या दुर्गेस आम्ही लेखिकांचा मानाचा मुजरा.

सौ.मानसी मोहन जोशी
कार्यवाह आम्ही लेखिका
ठाणे शाखा

प्रतिक्रिया व्यक्त करा