12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाच्या विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने राज्यातील तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालय येथे शनिवार दि. 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव यांनी दिली.
जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय व. स्तर व मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे विनाविलंब निर्णय करुन व पक्षकारांनी शांततेने जीवन जगण्यासाठी त्यांच्या संमतीने तडजोडीने प्रकणे निकाली काढण्यात येणार आहेत. याममध्ये फौजदारी, दिवाणी, कौटुंबिकवाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे आदी प्रकरणे सामंजस्याने या लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहेत.
आतापर्यंत 3 हजार 105 प्रलंबित प्रकरणे तडजोडीने ठेवण्यात आली आहेत. तर 5 हजार 103 प्रकरणे वादपूर्व प्रकरणे तडजोडीने ठेवण्यात आली आहेत. शांततेने व सलख्याने ही प्रकरणे सोडवण्यात येणार आहेत. लोकअदालतीचे पॅनल सदस्य हे अनुभवी वकील असतात. तर पॅनेल प्रमुख हे न्यायाधीश असतात. पक्षकारांची बाजू ऐकून समन्वयाने उभयतांमध्ये तडजोड सामंजस्य घडवितात. जिल्ह्यातील पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात येथील यांचा लाभ जिल्ह्यातील पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.