*भाग्योदय साहित्य संच, उजैनकर फाऊंडेशन, बुलढाणा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष, बुलढाणा लेखक कवी श्री.मनोहर पवार यांची अप्रतिम काव्यरचना*
*निष्ठा*
कविता ,
आणि साहित्य यावर
कवी , ……….. वास्तव !
याबदद्ल असायची
त्याला कनव !
भरभरून बोलायचा तो
माणसावर ! …… आणि साहित्यावर !
साहित्यात माणूस हा
केंद्रबिंदु असला पाहिजे !
असे तो छाती ठोकून सांगायचा !
मी भावूक झालो
आणि आशाळभूत ही
मला तो भासला
देवाप्रमाणे !
मीही लिहीला एक
अर्थपूर्ण कविता संग्रह
आणि गेलो मोठ्या अपेक्षेने !
त्याच्याकडे मैलाचा प्रवास
… करण्यासाठी…….………..
प्रस्तावना लिहावी म्हणून !
अरे वा !! ……….
छान असे म्हणून त्याने
विचारपूस करून घेतला
माझा काव्यसंग्रह !
मीही सुखावलो काळजात
किती मानधन देणार मला ?
प्रस्तावना लिहीण्यासाठी !
मीही क्षणभर अवाक……..
खरचं शब्द न फुटले ओठी !
मी देताच नकार त्याने
म्हटले उठा निघा !………
लावतो दार !
त्याची साहित्य निष्ठा आणि
माणुसकीचा मला ….
झाला साक्षात्कार !
येथे आलो चुकून
कळले मला…….
उशिरा फार !…….……………