सावंतवाडी
शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तथा सावंतवाडी नगरपालिकेचे प्रशासक यांचे लक्ष वेधले. सावंतवाडी शहरातील मोठ्या दिमाखात उद्घाटन होऊन देखील बंद अवस्थेत असलेले स्विमिंग पूल ,इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅरिस्टर नाथपई हॉल ,आता लग्नसराई सुरू होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात हॉल उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांसाठी खुले करण्यात यावे, कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने किमान आठवड्यातून एकदा धुवून स्वच्छ करणे, अनधिकृत रित्या गटारात सोडण्यात येणारे सांडपाणी, फुटपाथ कोसळून कित्येक दिवस झाले असून अद्याप पर्यंत दुर्लक्षित असलेला मोती काठाचा फूटपाथ, सावंतवाडी शहरात प्रवेश करताना ठिकठिकाणी टाकण्यात आलेला कचरा, कोट्यावधी रुपये खर्च करून अद्याप बंद असलेले कोलगाव येथील शासकीय गोदाम, इत्यादी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
पालिका प्रशासनाकडून याबाबत लवकरात लवकर समस्यांचे निरासरण करण्याचे आश्वासन तसेच येत्या 15 तारीख पर्यंत स्विमिंग पूल सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचे आश्वासन माननीय पानवेकर साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष राजगुरू उपस्थित होते.