You are currently viewing सारेच पुरुष नसतात बदनाम; काव्यसंग्रहाचे शनिवारी सावंतवाडी प्रकाशन..!

सारेच पुरुष नसतात बदनाम; काव्यसंग्रहाचे शनिवारी सावंतवाडी प्रकाशन..!

कवी अजय कांडर; प्रा. वैभव साटम, मधुकर मातोंडकर आदींचे संपादन.

सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग

सावंतवाडी

सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १९ कवयित्रींच्या कवितांचा सहभाग असलेला आणि कवी अजय कांडर, वैभव साटम आणि मधुकर मातोंडकर यांनी संपादित केलेल्या ” सारे पुरुष नसतात बदनाम” या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार १२ नोव्हेंबर रोजी सायं. ५.३०वा. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनात संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या नामवंत कवयित्री तथा डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ (पुणे) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचा उपक्रम म्हणून प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या संग्रहात मनीषा पाटील, सरिता पवार,रुपाली दळवी – नाईक, प्रा. प्रियदर्शनी पारकर, ऍड. मेघना सावंत, योगिता राजकर, शालिनी मोहळे, प्रमिता तांबे, प्रा. सुचिता गायकवाड, स्नेहा राणे, आर्या बागवे, मनीषा शिरटावले, रीना पाटील, ऍड. प्राजक्ता शिंदे, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, योगिता राजकर, मृणाल पिळणकर आणि अंजली ढमाळ आदींच्या प्रत्येकी चार कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेमध्ये त्यांनी प्रत्येक कवयित्रीच्या कवितांची विस्ताराने दखल घेतली आहे. यामुळे तळकोकणातील म्हणजे प्रामुख्याने सिंधुदुर्गातील कवयित्रींची कविता या संग्रहाच्या माध्यमातून चोखंदळ वाचकांपर्यंत पोहोचायला मदतच होणार आहे. या प्रस्तावनेत अंजली कुलकर्णी म्हणतात “सारेच पुरुष नसतात बदनाम” हा अतिशय महत्त्वाचा प्रतिनिधीक काव्यसंग्रह मराठी काव्य क्षेत्रात प्रसिद्ध होत आहे. याची दखल मराठी साहित्यात अभिजात साहित्य रसिकांनी घ्यायला हवी. तर आपल्या संपादकीय मध्ये अजय कांडर म्हणतात, पुरुषाने स्त्रीवर कायमच अन्याय केला. याला पुरुष सत्ताक परंपरा जबाबदार आहे. परंतु आता काळ बदलतो आहे. स्त्रीच्या हक्कासाठी पुरुषही लढा लढताना दिसतो आहे. अशा सहृदयी पुरुषा बद्दलची भावना या प्रातिनिधीक काव्य संग्रहामधील कवितांमध्ये असल्याने या या संग्रहाचे मोल अनमोल असेच आहे. संग्रहाचे पुणे येथील प्रसिद्ध तरुण चित्रकार मुक्ता कदम यांनी मुखपृष्ठ तयार केले आहे मुखपृष्ठा विषयीचा दीर्घ लेखही या संग्रहात समावेश करण्यात आला आहे.असा प्रयोग कवितेच्या संग्रहाबाबत मराठी साहित्यात प्रथमच करण्यात आल्यामुळे याची दखलही जाणकार रसिकांकडून घेण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =