अवैध दारू वाहतूक रोखा; अन्यथा 1 डिसेंबरला विजघर “एक्साईज चेकपोस्ट” येथे उग्र आंदोलन..
दोडामार्ग :
गोव्यातून चंदगडच्या दिशेने तसेच कुंभवडे, तळकट, मोर्ले ते परगड येथून होणारी बेकायदा दारू वाहतूक कोल्हापूर येथील भरारी पथक रोखत आहेत. काही दिवसापूर्वी अशीच एक गाडी विजघर चेकपोस्ट मधून माहित असून सुद्धा सोडण्यात आली होती तीच गाडी पुढे घाटात जाऊन बंद पडली. विजघर चेकपोस्ट येथे अधिकारी असून सुद्धा येथून दारूची गाडी गेलीच कशी? राज्य उत्पदान शुल्क विभाग सिंधुदुर्ग मध्ये असून सुद्धा अशा प्रकारची वाहतूक होते म्हणजे *गस्त घालणारे अधिकारी हफ्ते घेण्यात व्यस्त आहेत का?* असा सवाल दोडामार्ग विभाग अध्यक्ष अभय देसाई यांनी केला. तालुकामधील विजघर चेकपोस्टला असणारे अधिकारी हफ्ते घेऊन सुशेगाद आहेत. विजघर चेकपोस्ट जवळ CCTV कॅमेरा 24 तास चालू असताना सुद्धा रोज 10 ते 15 लाख पेक्षा जास्त रुपये ची दारू वाहून रोजदारूच्या गाड्या त्या चेकपोस्ट वरून सहज पार होतात. त्यामुळे या प्रकारामागे नेमके दडलाय तरी काय? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हफ्ता घेण्यात व्यस्त असलेले चित्र आता मनसे स्टाईलने बंद करण्याची वेळ आली आहे. तरी प्रशासनने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा 1 डिसेंबरला विजघर “एक्साईज” चेकपोस्ट“ येथे उग्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा मनसेच्या माध्यमातून दोडामार्ग मनसे विभाग अध्यक्ष श्री.अभय पांडुरंग देसाई यांनी दिला आहे. गोवा बनवट दारूची वाहतूक रोकण्यासाठी विजघर चेकपोस्टला CCTV कॅमेरा बसवण्यात आला. परंतु मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अधिकारी कशात व्यस्त आहेत त्याचा विचार करण्याची गरज आहे. गोवा बनवट दारू वाहतुक कोणच्या आशीर्वादने होत आहे हयांचे सर्व पुरावे आमच्या कडे उपलब्ध आहेत. त्यामुळे मनसे कडून 1 डिसेंबर रोजी विजघर चेकपोस्ट येथे मनसे स्टाईलने “उग्र आंदोलन” करण्यात येईल याची प्रशासन ने नोंद घ्यावी.