You are currently viewing लोरे येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

लोरे येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कणकवली :

 

लोरे ग्रामपंचायतच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

गेल्या पाच वर्षात लोरे ग्रामपंचायतने सरपंच श्री.अजय रावराणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे लोरे गाव विकासाचे रोल मॉडेल म्हणून उदयास येत आहे असे प्रतिपादन राणे यांनी समारंभ प्रसंगी केले.

जनसामान्यांपर्यंत विविध उपक्रम राबविणाऱ्या आणि सातत्याने विकास प्रगतीपथावर असलेल्या लोरे गावच्या ग्रामपंचायतीचे आमदार साहेबांनी कौतुक केले. या व्यायाम शाळेचा लाभ गावातील महिलांनी सुद्धा घेण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री.तुळशीदास रावराणे, वैभववाडी माजी सभापती श्री. बाप्पी मांजरेकर, सिंधुदुर्ग भाजपा प्रवक्ता श्री. भालचंद्र साठे, लोरे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. प्रकाश रावराणे, लोरे विकास सेवा सोसायटी व्हा.चेअरमन श्री.सुमन गुरव, कणकवली माजी उपसभापती श्री. प्रकाश पारकर, कणकवली माजी सभापती श्री.मनोज रावराणे, सरपंच श्री अजय रावराणे व ग्रामपंचायत सदस्य, भारत श्री विजय मोरे, महेश रावराणे, अनमोल रावराणे, लोरे गावातील ग्रामस्थ बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोरे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा क्रीडा विभागामधून आम. नितेश राणे यांच्या शिफारशीने १४ लाख रुपये खर्च करून नवीन व्यायाम शाळेचे उभारणी केली आहे. गावातील तरुण युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व गावातील युवकांच्यातून तरुण खेळाडू निर्माण व्हावे व युवकांनी व्यसनापासून दूर राहून युवकांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने ग्रामपंचायतीने एक वेगळा उपक्रम राबवला आहे.

यावेळी बोलताना माजी सभापती मनोज रावराणे यांनी लोरे गावात विविध विकास कामे प्रगतीपथावर असून विरोधकांना बोट दाखवायला सुद्धा जागा नसल्याचे सांगितले. यापुढे सुद्धा गावच्या विकासासाठी, ग्रामस्थांच्या मदतीसाठी आम्ही सतत कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित “भारत श्री” शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. विजय मोरे सर यांनी ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा उत्तम सर्व साधनयुक्त सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारणी केल्याबद्दल लोरे गावचे कौतुक केले आणि अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून व्यायाम व्यायामशाळा संकल्पक सरपंच श्री अजय रावराणे यांनी गेल्या पाच वर्षातील ग्रामपंचायत मार्फत राबवलेल्या विविध उपक्रमांचा व योजनांनचा आढावा घेतला आणि यासाठी प्रत्येक वेळी आमदार नितेशजी राणे यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य श्री.नरेश गुरव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा