वेंगुर्ला :
भाजप युवा मोर्चा च्या वतीने उभादांडा सागरेश्वर येथील बंद असलेल्या वूडन अँड हाऊस च्या कामाबद्दल दिलेल्या निवेदनाला पालकमंत्र्यांनी लगेच कारवाई केली. त्यामुळे संबंधित यंत्रणा जागी झाली असून त्यांनी येथील काम सुरू केले आहे. एमटीडीसी चा प्रकल्प हा गेली बरीच वर्ष बंद होता. याची माहिती वेंगुर्ला युवा मोर्चा ने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिली. हा प्रकल्प पर्यटन वाढीस अनुकूल असल्याने पूर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष दिल्याने युवा मोर्चाचा या कामाबद्दल चांगला इंपॅक्ट झाला. सुरू झालेल्या या कामाची आज पाहणी युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी केली. यावेळी जिल्हा चिटणीस भूषण आंगचेकर, जिल्हा चिटणीस तथा परबवाडा उपसरपंच हेमंत गावडे, जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, मारुती दोडशनट्टी, तुषार साळगावकर, रॉबर्ट आराऊंज उपस्थित होते.