You are currently viewing श्री देव जैन भरतेश्वर मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न

श्री देव जैन भरतेश्वर मंदीरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न

मालवण :

 

सोमवारी कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी श्री भरतेश्वराची विधीवत पूजा अर्चा, सायंकाळी गावच्या रहाटी नुसार टीपर व दीप प्रज्वलन, मनाकऱ्यांना दीप वाटप, रात्रौ दीपोत्सव सोहळा, पालखी सोहळा, रात्रौ १२ वा. तेंडोलकर दशावतार मंडळाचा “आला सत्वरी भक्त कैवारी” हा दशावतारी नाट्यप्रयोग झाला. मंगळवारी पहाटे गाडगा फोडणे व दह्याचा काला, श्रीची पालखी मिरवणूक, रमाई नदीपात्रात श्रीचे अभ्यंग स्नान तदनंतर शक्तीपीठ श्री देवी माऊली मंदिर येथे श्री भरतेश्र्वराची शिव शक्ती भेट सोहळा, तदनंतर माऊली मंदीर ते भरतेश्र्वर मंदिरपर्यत पालखीचे प्रस्थान आदी धार्मिक कार्यक्रम झाले. यावेळी मानकरी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा