You are currently viewing इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे कादंबरी पुरस्कारासाठी आवाहन

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचे कादंबरी पुरस्कारासाठी आवाहन

इचलकरंजी/प्रतिनिधी

संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी एका साहित्य प्रकाराला साहित्य संस्कृती पुरस्कार देण्यात येतो.या वर्षी कादंबरीसाठी पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२१ या चार वर्षाच्या कालावधीतील एका उत्कृष्ट कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी लेखक किंवा प्रकाशकांनी आपल्या कादंबरीची एक प्रत २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत या पुरस्कारासाठी खालील पत्त्यावर पाठवावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले आहे.
संस्कृती प्रतिष्ठान इचलकरंजीतर्फे दरवर्षी विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातात.यात मागील चार वर्षातील विविध साहित्य प्रकारातील एका साहित्य प्रकाराला ५००० (रुपये पाच हजार), स्मृती चिन्ह,शाल आणि ग्रंथ भेट अशा स्वरूपाचा पुरस्कार दिला जातो आणि त्याचे वितरण डिसेंबर महिन्यामध्ये इचलकरंजी येथे आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संस्कृती संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष यांच्या हस्ते केले जाते.


यावर्षी १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२१ या चार वर्षातील उत्कृष्ट कादंबरीसाठी साहित्य संस्कृती पुरस्कार देण्यात येणार असून मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षणातून या पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. तरी ज्या प्रकाशक आणि लेखकांना आपली कादंबरी या पुरस्कारासाठी पाठवायची आहे त्यांनी पुढील पत्त्यावर पाठवावी.-

पत्ता:-
पंडित बापू कांबळे.
“बापूगंधा” ३/४५९/२
गुरूकुल काॅलनी, टाकवडे रोड, इचलकरंजी.
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर
४१६११५,
संवाद – ९१४६१०६६८८,
८३२९७९५३३६.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा