You are currently viewing पु, ल.

पु, ल.

*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री सुरेश शेठ यांची पु, ल. देशपांडे जयंती निमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी अप्रतिम काव्यरचना*

*पु, ल.*

पु ल. तुम्ही का सोडुन गेला
कोण ऐकवील आम्हा कथा
चितळे मास्तर ,अंतू बर्वा
हसवित होते आम्हा सर्वा

चाळ आगळी बटाट्याची
वरात वाऱ्यावरी निघाली
व्यक्ती वल्ली ,गण गोत, मैत्र
जिवंत सगळी व्यक्तीचित्र

अपूर्वाई ,पूर्वरंग ही
सुंदर तुमची प्रवासवाणी
भक्तीच्या कुशल अभिनयाने
फुलणारी तुमची फुलराणी

कोट्याधीश होतात तुम्ही
हजरजबाबी तुमची जिव्हा
वुडहाउसचे तुम्ही चाहते
निखळ विनोदी लेखनगाभा

सेवाभावी संस्थांमध्ये
रमले होते तुमचेही मन
सुनीताताईंच्या साथीने
धरेवर प्रकटले नंदनवन

पु. ल . ना काव्यात्मक आदरांजली

©️®️ *सुरेश शेठ*
९८९००६४१००

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा