कवठणी ग्रामस्थ आक्रमक; जनआंदोलनाचा इशारा
सावंतवाडी
मुळात अरुंद असलेला सावंतवाडी तालुक्यातील कवठणी मुख्य रस्ता अपघातास निमंत्रण ठरला आहे. याबाबत सातत्याने ग्रामस्थ लक्ष वेधत असताना, ठेकेदार आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी केला आहे.दरम्यान, संबंधित ठेकेदाराशी अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याने चौकशीची मागणीही होत आहे, अन्यथा या प्रश्नी जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही कवठणीवासियानी घेतला आहे. सार्वजनिक बांधकामंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचेही निवेदनाद्वरे लक्ष वेधण्यात आले आहे.
उपविभागीय अभियंता यांच्याकडे ७ जुलैला पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. कवठणी मुख्य रस्ता वळणा-वळणाचा तसेच अरुंद आहे. मुख्य रस्त्यावरील झाडी वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे सदर रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
सदर रस्त्यांचे झाडी मारण्याचे काम अर्धवट करण्यात आलेले आहेत. उर्वरित काम कधी करणार अशी विचारणा केली असता मक्तेदार व अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. सदर काम दिवाळीनंतर करू अशी उत्तरे मक्तेदार सहीत अधिकाऱ्यांकडून मिळतात. त्यामुळे सदर मक्तेदार यांची चौकशी करावी. सदर रस्त्यावर जिवीतहानी झाल्यास त्याला सर्वस्वी सदर खात्याचे अधिकारी जबाबदार राहतील.
वाढलेली झाडी तत्काळ साफ करण्याची कार्यवाही करण्यात यावी . अशी ग्रामस्थांची रास्त मागणी आहे.