You are currently viewing ग्रामपंचायतच्या पत्रानंतर कुंब्रल वासियांचे उपोषण मागे

ग्रामपंचायतच्या पत्रानंतर कुंब्रल वासियांचे उपोषण मागे

शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हा प्रमुख गणेशप्रसाद गवस, सरपंच प्रवीण परब यांची मध्यस्थी आली फळाला

ग्रामपंचायतचे जिल्हाधिकार्‍यांना वाहतूक बंद करण्यासंबंधी निवेदन

दोडामार्ग

परमे येथील राव यांच्या क्वांरीवरून होणारी खडीची वाहतूक ही उलटी शिरवल कुंब्रल मार्गे सासोली अशी होत आहे यासाठी वेळोवेळी जनप्रक्षोभ पहावयास मिळाला होता. त्यातूनच कालपासून कुंब्रल येथील रहिवाशी लक्ष्मण सावंत, जगदीश सावंत, बाबाजी नाईक व शशिकांत डेगवेकर यांनी कुंब्रल ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात केली होती. यावेळी या उपोषणाचा आज संध्याकाळी दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, कुंब्रल सरपंच प्रवीण परब तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत देसाई तसेच शिव उद्योग संघटनेचे तालुका समन्वयक रामदास मेस्त्री यांनी भेट घेऊन सदर उपोषण आपण मागे घ्यावे पालकमंत्री व इतर मंत्र्यांशी चर्चा करून या वाहतुक बंदी बाबत तोडगा काढला जाईल असे सांगितले. मात्र शासन स्तरावर आम्हाला आतापर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नसून वेळोवेळी शासन आम्हाला ही वाहतूक सुरू करण्यासंदर्भात अनेक लोकांच्या सह्या आमच्याकडे आलेले आहेत, त्याविरोधात अशाच गाववासियांच्या सह्या आल्यास आम्ही वाहतूक बंद करू असे म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई संबंधितांनी केलेली नाहीये.

याअगोदर सुद्धा उपोषणाची तारीख देऊन ते स्थगिती करण्यासंदर्भात आम्हाला पत्र आले व कारवाई होईल असे सांगितले होते. यानंतर आम्ही उपोषण स्थगित केले होते मात्र वाहतूक काही केल्या बंद होत नाहीये त्यामुळे निसर्गसौंदर्य असलेला कुंब्रल गाव भकास होताना दिसत आहे तसेच सदर वाहतूक करण्यासंदर्भात रस्त्याची स्थिती तेवढी चांगली नसून या ठिकाणी एखादा अपघात होऊन कोणी व्यक्ती मृत्यू पावली असता त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सुद्धा यावेळी आंदोलकांनी विचारला तर आतापर्यंत अलिप्त असलेले ग्रामपंचायती या लढ्यात उतरली असून ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रवीण परब यांनी जिल्हाधिकारी संबंधित विभागा यांना पत्र लिहून त्यातूनही वाहतूक बंद करण्यासंदर्भात सुचविले असल्याचे सांगत लवकरच ही कारवाई होईल असे सांगताच त्याचे पत्र आम्हाला द्या असे आंदोलकांनी सांगतात प्रवीण परब यांनी आपल्या सही व शिक्का निश्चित असे पत्र आंदोलकांना दिले त्यामुळे अखेर हे आंदोलन आज मागे घेण्यात आले तर पुन्हा ही वाहतूक अशाच प्रकारे सुरू राहिल्यास कोणत्याही परिस्थितीत आम्ही वाहतूक बंद होईपर्यंत आंदोलन करू असे आंदोलकांनी सांगितले.

लक्ष्मण सावंत, जगदीश सावंत, बाबाजी नाईक व शशिकांत डेगवेकर, विलास सावळ, आनंद सावंत, देविदास सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 10 =