तेजस ठाकरेंनी शोधला सह्याद्रीच्या पर्वतरांगात “हिरण्यकेशी” नवा मासा..

तेजस ठाकरेंनी शोधला सह्याद्रीच्या पर्वतरांगात “हिरण्यकेशी” नवा मासा..

मुंबई :

सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी शोधून काढली आहे. सोनेरी रंगाचे केस असणारा माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत शोधली आहे. या माश्याची ही 20 वी प्रजाती असून तेजस ठाकरे यांनी शोधलेली चौथी प्रजाती आहे. त्यांनी या आधी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.

आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही त्यांना प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती. आता हिरण्यकेशी नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचे नाव ‘हिरण्यकेशी’ असे ठेवण्यात आले आहे.

सोनेरे रंगाचे केस असणारा असा याचा संस्कृत अर्थ आहे. तेजस ठाकरे यांना माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉ. प्रवीणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत, यांचे सहकार्य मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा