You are currently viewing नुसते खड्डे बुजवण्याचे काम नको तर तात्काळ नवीन पुलाचे काम हाती घ्या ; उपसरपंच गणपत डांगी

नुसते खड्डे बुजवण्याचे काम नको तर तात्काळ नवीन पुलाचे काम हाती घ्या ; उपसरपंच गणपत डांगी

येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष पुलाच्या कामाची सुरुवात न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा

दोडामार्ग

नुसते खड्डे बुजवण्याचे काम नको.तर तात्काळ नवीन पुलाचे काम हाती घ्या येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष पुलाच्या कामाची सुरुवात न केल्यास त्याच कॉजवेवर उपोषण करणार असा इशारा साटेली भेडशी उपसरपंच गणपत डांगी यांनी दिला आहे.

दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरील भेडशी येथील कॉजवेलाछोटे मोठे खड्डे, भगदाड पडण्याची मालिका सुरू झाली असून अशीच स्थिती राहिल्यास अचानक वाहतूक सुरू असताना भगदाड पडल्यास अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.शुक्रवारी मध्यरात्री असेच मोठे भगदाड पडले आणि अपघात होता होता वाचला.पुढील अपघात टाळण्यासाठी भेडशीतील युवकांनी कार्यतप्तरता दाखवत भगदाड पडलेल्या ठिकाणी पत्र्याचे बॅरल व सूचना फलक लावले.तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या घटनेची कल्पना देऊनही भगदाड पडल्याच्या घटनेस चोवीस उलटून गेली तरी जैसे थे अशी स्थिती आहे यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतेही सोयरसुतक नाही असेच म्हणावे लागेल. हा विभाग फक्त त्या पुलाच्या काम घेतलेल्या ठेकेदाराला वाचविण्याचे आणि त्याचीच बाजू घेण्याचे काम करीत आहे असा आरोप श्री डांगी यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा