देवगड
देवगड उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे उद्या आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन होत असून देवगड वासी यांचे आरोग्य विषयक मोठे स्वप्न गेले कित्येक वर्षांनी पूर्ण होणार आहे. हडकोच्या मदतीतून 22 कोटी रुपयांचा घसघशीत निधी या उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर करून आणण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले आहे
22 कोटी रुपयांमध्ये तळमजला अधिक दोन मजले अशी भव्य इमारत उभी राहणार आहे तिसरा मजला प्रस्तावित असून त्याची मंजुरी ही लवकरच मिळणार आहे. या भूमिपूजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील तसेच देवगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विटकर, डॉ. भगत उपस्थित राहणार आहेत.