You are currently viewing वायगंणतड येथे कोंबडी वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात

वायगंणतड येथे कोंबडी वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात

चालक वाहक किरकोळ जखमी तर गाडीचे नुकसान : 140 नग कोंबडी मृत पावली

दोडामार्ग

दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच 09सियु 3154) या वाहानारिंल चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात .

हा प्रकार शनिवारी पहाटे 3:00च्या सुमारास घडला.यात चालक वाहक किरकोळ जखमी झाले.तर गाडीचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले.आणि बॉयलतर कोंबडी 140 नग मेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मात्र सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की घाटमाथ्यावरुन आपल्या ताब्यातील गाडी( एम एच 09शियु 3154) दोडामार्गच्या दिशेने बॉयलर कोंबडीची वाहतुक करत असताना गाडीला अपघात झाला.सदरचा अपघात हा चालकाचा वाहानाचा भरधाव वेग असल्याने घडला असल्याचे ग्रामस्थतून बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा