गाळ शेती योग्य असेल तर फुकट न्यावा; दगड, रेती असेल तर त्यावर रॉयल्टी भरावी
सिंधुदुर्गनगरी :
जलजीवन योजनेमध्ये ज्यांना निधी मिळाला नाही, त्यांची यादी करा आणि नवा प्रस्ताव तयार करा आणि तो पाठवा. विजयदुर्ग नळयोजना, रमाई, विलवडे, जाणवली, माडखोल येथील गाळ काढला आहे. २०२२, २०२३ ला या कामांना कोणतीही स्थगिती नाही. आपत्ती व्यवस्थापन मध्ये ही कामे केले आहे. विजयदुर्ग मधील, गाळ सुद्धा काढला जाणार आहे. या सूचना जिल्हा नियोजन समिती मध्ये पालकमंत्री चव्हाण यांनी केल्या. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काम कोण करतात आणि त्या कामांची आजची स्थिती काय हे सदस्यांना कळवा अशा सूचना दिल्या. शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, गाळ पुन्हा नदीत येवू नये म्हणून तो लोकांना द्यावा. यावर पालकमंत्री म्हणाले तो शेती योग्य असेल तर फुकट न्यावा आणि दगड, रेती असेल तर त्यावर रॉयल्टी भरावी. त्यासाठी तहसीलदाराकडून अहवाल घेण्याच्या सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्या.