You are currently viewing ७ नोव्हेंबर रोजी मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायण जत्रोत्सव

७ नोव्हेंबर रोजी मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायण जत्रोत्सव

मालवण :

 

सोमवार ७ नोव्हेंबर रोजी मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायण जत्रोत्सव संपन्न होत आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ ९ .३० वाजता पुराणवाचन सांगता, त्यानंतर मंदिर व मंदिराच्या कळसावर कोहाळ्याचे दिवे करुन श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरांवर दिप लावून दीपोत्सव साजरा होणार आहे. त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणूक होणार असून श्री देव रामेश्वर एकरात्र श्री देव नारायण भेटीस थांबतो.

रात्री १२.०० वाजता गोरे दशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी व त्या नतंर प्रथेनुसार देव स्नान साठी पालखी कवटकर पुला जवळ जाणार. तेथे ब्राह्मण हस्ते स्नान पूजा होते व त्यानंतर श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी श्री देव रामेश्वर मंदिरकडे मार्गस्थ होणार आहे. या कार्यक्रमाला प्रथेनुसार रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांच्या राजदंड (चांदिचा) किल्ल्यावरील मानकरी वाजत गाजत किल्ल्यावरुन घेऊन येतात व ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतात. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा