You are currently viewing शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर येथे थाटात संपन्न

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर येथे थाटात संपन्न

*शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळागड जिल्हा कोल्हापूर येथे थाटात संपन्न*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी व राजर्षी छत्रपती शाहू महाराज व्यासपीठ संजीवन नॉलेज सिटी पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी नुकतेच थाटात संपन्न झाले या ठिकाणी ग्रंथ दिंडीने प्रारंभ झाला याप्रसंगी ३० विद्यार्थ्यांचा झांज पथक ग्रंथ दिंडी वारकरी संप्रदायाच्या निनादात ग्रंथ दिंडी भव्य स्वरूपात निघाली यामध्ये सर्व साहित्यिक रशीक मान्यवरांचा सहभाग होता त्यानंतर उद्घाटन सत्रात भारताचे माजी पराराष्ट्रसचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे नवी दिल्ली यांनी भ्रमणध्वनी द्वारे या संमेलनाला शुभेच्छा दिल्या व पुढील संमेलन हे दिल्लीमध्ये मी आयोजन करणार अशा प्रकारचे आश्वासन सुद्धा दिले त्यानंतर भारताचे माजी कायदामंत्री व गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अँड रमाकांत खलब साहेब यांच्या शुभहस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार दि.बा.पाटील संमेलनाचं स्वागताध्यक्ष संजीवन नॉलेज सिटीचे पन्हाळाचे सहसचिव प्राचार्य एन. आर.भोसले संमेलनाचे निमंत्रक तथा फाउंडेशनचे राज्य संपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत पाटील सह निमंत्रक तथा फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक परशराम अंबि संयोजक प्रकाश पाटील सहसंयोजक शिल्पकार एम.डी.रावण मार्गदर्शक डॉ. मा. ग. गुरव आणि मुख्य आयोजन शिवचरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, समन्वयक तसेच गोवा राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसांगी १५ मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अँड रमाकांत खलप साहेब म्हणाले की शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे हे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन आमच्या गोवा येथील बोरी, फोंडा या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी संपन्न झाले आज हे संमेलन या ठिकाणी आयोजित असून खऱ्या अर्थाने उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर हे मराठी भाषा प्रबोधन प्रचार आणि प्रसारासाठी आणि सर्व साहित्यिक रसिकांना व्यासपीठ देण्यासाठी कार्य करत असल्याचे त्यांनी फाउंडेशनचे कौतुक केले


प्रसंगी भोजनानंतरच्या सत्रामध्ये उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. सतिश तराळ अमरावती यांचे अध्यक्षतेखाली कथा कथांन रंगतदार झाले.याप्रसंगी डॉ. मंदा नांदुरकर अमरावती प्रा.अशोक कोकाटे कोल्हापूर आदींनी सहभाग नोंदवला याप्रसंगी ता महाजन सौ.नसीम जमादार मॅडम पुष्पा तेली सौ. पुष्पा दरेकर आदींनी सूत्रसंचालन केले. त्यामध्ये निमंत्रक डॉ. श्रीकांत पाटील यांची ग्रामीण कादंबरीकार म्हणून लेखक मुलाखत खूप छान प्रतिसादात संपन्न झाली. समारोपीय सत्रामध्ये काही ठरावही मांडण्यात आले ते पुढीप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा शासनाने इतर संस्थांच्या साहित्य संमेलनाला अनुदान प्राप्त करून द्यावे इंग्रजी भाषेचे होत असलेले अतिक्रमण शासनाने रोखण्याचा व मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन यांनी भाषा संवर्धनासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यास साहित्य संस्थांना, साहित्य संमेलन, पुस्तकं प्रकाशन आदींना अर्थ सहाय्य देऊन प्रोत्साहित करावेत विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा. साहित्य सेवा करणाऱ्या, झटणाऱ्या व्यक्तीला साहित्य महामंडळाचे विविध पदांवर घेऊन साहित्य सेवा अर्थ मंडळ स्थापन करावे त्यातून वाचन संस्कृती व वाचनालये आणि साहित्य जीवंत राहील. आदी महत्त्वाचे ठराव या प्रसंगी करण्यात आले.सर्व सहभागी साहित्यिक ,रसिकांनी टाळ्यांच्या गजरात या ठरवाना संमती दिली. त्यानंतर शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद साहित्यिक रसिकांनी दिला त्यामध्ये फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शाहीर मनोहर पवार बुलढाणा अँड सर्जेराव साळवे औरंगाबाद श्री अवसरमोल अँड विजयकुमार कस्तुरे बुलढाणा यांनी सहभाग घेतला.या दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा राज्यातील 300 च्या वर साहित्यिक रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर सरांचे मनापासून कौतुक केले.

 

Advertisement
_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =