You are currently viewing ७ रोजी परुळे येथे भव्य चपई स्पर्धा

७ रोजी परुळे येथे भव्य चपई स्पर्धा

वेंगुर्ले 

श्री अंबाबाई सिद्धाई चपई ग्रुप व मित्र मंडळ परुळे वेंगुर्ला आयोजित जिल्हास्तरीय भव्य चपई स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी वराठी मंगल कार्यालय परुळे बाजार वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10000 हजार व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7000 व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 5000 व आकर्षित चषक तसेच वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट थाळा वादक,उत्कृष्ट मुरली वादक यांना सुद्धा रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे नियम ही स्पर्धा जिल्हास्तरीय राहील 5 नोव्हेंबर पूर्वी संघाने आपली नाव नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्या 15 संघांना प्राधान्य दिले जाईल. एका संघात जास्तीत जास्त 12 व कमीत कमी 8 स्पर्धक राहतील, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील येणाऱ्या प्रत्येक संघास सहभाग सन्मानचिन्ह दिले जाईल. सादरीकरणाची वेळ 12 मिनिटे राहील सर्व संघानी 7 नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रमास्थळी उपस्थित रहावे. असे आव्हान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहे. अधिक माहिती साठी रवी लांबर 94045726831, गणेश लांबर 7744952076, रुपेश लांबर 9405726343, रितेश शेळके 9673952585 संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा