You are currently viewing भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश.

भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दावेदारी पक्की..

कोल्हापूर विभागातील तंत्रनिकेतन संस्थांकरीता आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली.

ही स्पर्धा तळसंदे, कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तंत्रनिकेतन संस्थांचा सहभाग होता.

विजयी संघामध्ये संजय गाळेलकर, आर्यन गावडे (सिव्हिल), स्वानंद कामतेकर (इलेक्ट्रिकल), सिद्धेश पवार (कॉम्प्युटर), मितेश गावडे (मेकॅनिकल) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून प्रथम वर्षाचे प्रशिक्षक दिगंबर पाटील यांनी काम पाहिले.

भोसले पॉलिटेक्निकचा विजयी संघ कोकण ज्ञानपीठ, कर्जत, जि. रायगड येथे 26-27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेईल. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =