You are currently viewing ४ नोव्हेंबर पासून ओसरगाव श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव

४ नोव्हेंबर पासून ओसरगाव श्री.विठ्ठल रखुमाई मंदिर येथे हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव

कणकवली :

 

ओसरगाव कानसळीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शुक्रवार दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हरीनाम सप्ताह व वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. दि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. विधिवत पूजा, ९ वा. घटस्थापना, १० वा. पासून स्थानिक भजने, सायं. ७ वा. पासून दिंड्या, भजने, चित्ररथ आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने सकाळी ९ वा. विधीवत पूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, रात्रौ ८:३० वा चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत नाटय, हास्य, विनोदाचा कलाविष्कार असा डान्स शो व ठीक रात्रौ १२ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटयमंडळ, चेंदवण निर्मित दशावतारी नाटक होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल रखुमाई विकास मंडळ स्थानिक व मुंबई यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा