दत्ताराम कोळमेकर यांच्या वतीने ॲड. परिमल गजानन नाईक यांचा युक्तिवाद
सावंतवाडी
निवडणुक प्रक्रियेतील उमेदवार गंगाराम राजाराम शेळके, (रा. धनगरवाडी, धाकोरे, ता. सावंतवाडी,) यांनी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. सावंतवाडी या संस्थेच्या सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. सदर उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये फेटाळलेला असल्याने त्यांनी ओरोस येतील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे न्यायालयात अपील दाखल केलेले होते.
गंगाराम शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा त्यास दुसरे उमेदवार दत्ताराम कोळमेकर यांनी छाननी प्रक्रियेदरम्यान अपिलार्थी गंगाराम शेळके यांचे नाव जाहीर झालेल्या संस्थेच्या अंतीम मतदार यादीमध्ये नाव नसताना अपीलार्थी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. असा आक्षेप घेतलेला होता. त्यावरून अपीलार्थी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेला होता. त्याविरुद्ध त्यांनी अपील दाखल केले होते.
दत्ताराम कोळमेकर यांच्या वतीने ॲड. परिमल गजानन नाईक यांनी युक्तीवाद करताना अपेलेंट यांचे नाव तसेच त्यांचे सुचक व अनुमोदक यांचे नाव संस्थेच्या अंतीम मतदार यादीत नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर ज्या प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे. त्याचा सुद्धा उल्लेख नाही व त्यांचे नाव मतदार यादीत रितसर नमुद नाही, तसेच छाननीच्या वेळी आवश्यक तो लेखी पुरवा अपेलेंट यांनी सादर केला नाही परिणामी नामनिर्देशन पत्र परिपुर्ण स्वरूपाचे नाही. तसेच अपीलात नमुद केलेले मुद्दे, सहकार अधिनियम १९६० अथवा महा.सहकारी संस्था, समीती निवडणुक अधिनियम २०१४ च्या कक्षेत बसत नाहीत सबब निवडणुक अधिकारी यांनी योग्य व रास्तरीत्या अपेलेंट यांचा उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी बाद ठरविला.या मुद्द्यांच्या आधारे युक्तीवाद करत बाजू मांडली.