You are currently viewing 17 कोटी 72 लाख 78 हजार 600 रुपयांच्या कामास मंजुरी

17 कोटी 72 लाख 78 हजार 600 रुपयांच्या कामास मंजुरी

कातकरी समाजवस्त्यांसाठी पाणी पुरवठा योजना प्रकल्प अहवाल करुन तातडीने काम करा

 – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हर घर जल से नल पाणी पुरवठा जल जीवन मिशनमध्ये आज 17 कोटी 72 लाख 78 हजार 600 रुपयांच्या 19 कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. कातकरी समाजाच्या दोन वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्याचा प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने काम हाती घ्यावे, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.

            जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची आज सभा झाली या सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यकारी अभियंता प्रसाद पाताडे यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली.

            जल जीवन मिशन अंतर्गत सन 2021-22 मधील सुधारणात्मक पुनर्जोडणी व नव्याने हाती घ्यावयाच्या 17 कोटी 72 लाख 78 हजार 600 रुपयांच्या 19 योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

            तसेच सन 2021-22 मधील 32 कामांसाठी जीएसटीवाढीमुळे 19 कोटी 56 लाख 84 हजार 800 रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 18 =