निवृत्तवेतनधारक, कुटुंब निवृत्तवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे
सिंधुदुर्गनगरी
निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारक यांनी दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत हयात प्रमाणपत्र संबंधित बँकेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी केले.
सर्व निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांच्या नावाची यादी संबंधित बँकांकडे पाठविण्यात आलेली आहे. त्या यादीमधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करण्यात यावी. राज्य शासकीय निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांनी आपले हयाचे प्रमाणपत्र निवृत्तवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये सादर करणे आवश्यक आहे. हयातीच्या दाखल्यासोबत सध्याचा भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक व आधारककार्ड क्रमांक आदी माहिती सादर करावयाची आहे. शिवाय निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांनी पुन:श्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्विकारली नाही, तसेच पुर्नविवाह केलेला नाही. याबाबतची माहिती संबंधित बँकांकडे सादर करणे आवश्यक आहे.