रक्त दान हे श्रेष्ठ दान
सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठान – सिऺधुदुर्ग याऺचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद — प्रसऺन्ना देसाई
श्री.देव खरोबा युवक कला – क्रीडा मंडळ , नाटेलीवाडी – मातोऺड आणि सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठान , सिऺधुदुर्ग – शाखा – वेऺगुर्ला याऺच्या संयुक्त विद्यमाने आणि एस्.एस् .पी.एम .लाईफटाईम हाॅस्पीटल,पडले – कसाल याऺच्या विशेष सहकार्याने श्री.देव रवळनाथ सभागृह , मातोऺड विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर म्हणून मातो॑ड सरपंच जान्हवी परब , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , सावंतवाडी महीला मोर्चा अध्यक्षा मोहीनी मडगावकर , ता.उपाध्यक्ष संतोष गावडे , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , शक्ती केंद्र प्रमुख ताता मेस्त्री , कीशोर परब , लाईफ टाईम हाॅस्पीटल चे मनीष यादव , बुथ प्रमुख हर्षल परब व शेखर परब , वर्षा कुडाळकर , तुकाराम परब , देवा काऺबळी , श्रीकांत परब , सचीन कोऺडये , नितीन परब ( तळवडेकर ) सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेऺडोऺलकर , ता.अध्यक्ष अलिस्टर ब्रीटो , जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ , संजय पिळणकर ( सावंतवाडी – दोडामार्ग विभाग प्रमुख ) , बाबली गवंडे ( सावंतवाडी या.सचिव ) इत्यादी उपस्थित होते .
यावेळी उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसऺन्ना देसाई यांनी श्री.देव खरोबा युवक कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांचे रक्तदाना सारखा सेवाभावी उपक्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले . तसेच संपूर्ण सिऺधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाची चळवळ उभी केल्याबद्दल सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले .
मान्यवरांचे स्वागत व सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी केले . रक्तदान कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सिऺधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै.सनी रेडकर व मातो॑डचे माजी सरपंच कै.उमेश परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी खरोबा युवक कला क्रिडा मंडळ मातोंड नाटेलीवाडी चे कार्यकर्ते संजय केणी ,प्रथमेश नाईक , प्रसाद नाईक , ओमकार कोरगावकर , निखिल वैद्य ,अमर जबडे , नारायण केणी , सुनिल जबडे , पलाश वैद्य ,दिपेश नाईक , शुभम नाईक , यशवंत (भाऊ) केळजी , विशाल बागायतकर इत्यादी उपस्थित होते.