You are currently viewing सावंतवाडी शहरात उभाबाजार व माठेवाड तर  तालुक्यात मौजे मळेवाड येथे कंटेन्मेंट झोन….

सावंतवाडी शहरात उभाबाजार व माठेवाड तर  तालुक्यात मौजे मळेवाड येथे कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी :

सावंतवाडी शहरात उभाबाजार येथील दुर्वांकुर इमारतीमधील सदनिका क्र.203 दुसरा मजला चोहबाजूचे अंदाजे क्षेत्र 30 मीटर परिसर  दिनांक 14 ऑक्टोबर 2020पर्यंत, सावंतवाडी- माठेवाडा येथील घर क्र. ए-51 रुम क्र. 1 चे आजूबाजूचे क्षेत्र पूर्व बाजूस रुम नं.2 कच्ची पाणंद, पश्चिम बाजूस 4 मीटर, मोकळी जागा, उत्तर बाजूस 2 मीटर मोकळी जागा दक्षिण बाजूस 4 मीटर, मोकळी जागा असा चोहबाजूचा अंदाजे क्षेत्र 45 मीटर दिनांक 21 ऑक्टोबर 2020  मौजे मळेवाड- हेदुळवाडी येथील घर क्र. 595 चा 30 मीटर परिसर दिनांक 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + twelve =