वेऺगुर्ले
संपूर्ण वेऺगुर्ले तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पाॅज मशिन चालत नसल्याने नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे . रास्त धान्य दुकानावर फेरया मारुन गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे . ३१ तारीख महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी ६०% लोकांना अजूनही धान्य मिळाले नाही. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा शिष्टमंडळाने जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार वेऺगुर्ले यांची भेट घेतली. तसेच धान्य वितरणासाठी आठ दिवसाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली. तसेच आगामी दौऱ्यात नाम.रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन धान्य वितरणाचा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भाजपा मार्फत पाठपुरावा करणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले .
यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक, विश्वनाथ परब, गोविंद परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.