You are currently viewing गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जागा मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी द्या…

गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जागा मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी द्या…

नितेश राणे यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन सादर

गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जमिनीपैकी २६ हेक्टर जागा नियोजित मत्स्य व्यवसाय महाविद्यालयासाठी द्यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन केली आहे

देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करणेसाठी मी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागणी केली आहे. सदर मागणीनुसार प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. मत्स्य महाविद्यालयासाठी २६ हेक्टर जागा आवश्यक आहे. मौजे गिर्ये ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथील भूमापन क्रमांक १३६ ठिकाणाचे नाव कुडेटेंब ही ४१ हेक्टर जागा मा. महासंचालक, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, पुणे यांचे नावे असून ती सद्या रिक्त आहे. तरी सदर जागेपैकी २६ हेक्टर जागा मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी मिळावी ही विनंती असे पत्रात म्हटले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा