कणकवली :
राज्यातील सत्ता आणि स्वतःचे मंत्रिपद गेल्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सैरभैर झाले आहेत. टाटा एअर बस आणि वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात ला जाणे हे ठाकरेंच्याच महविकास आघाडी सरकारचे पाप आहे अशी बोचरी टीका बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते माजी खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केली आहे.
मविआ सरकारच्या काळातील स्वतःच्या पापांचे खापर नाहक शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचा बालिश प्रयत्न करून आदित्य ठाकरे स्वतःचे पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.टाटा एअर बस प्रकल्प गुजरात ला गेला आणि त्यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बाळासाहेबांची शिवसेना – भाजपा युती सरकारला टार्गेट केलं आहे.
ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेताना माजी खा. सावंत यांनी सत्ता आणि मंत्रिपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेले आदित्य ठाकरे अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.