दोडामार्ग
गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात पाणी पुरवठा करणारी विंधन विहिर गाळाने भरून आतील मोटार पंप खराब झाला होता त्यामुळे दोडामार्ग रूग्णालय रूग्णांची पाण्याअभावी मोठी गैरसोय होत होत होती. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली होती . विंधन विहीर पंप नवीन बसवायला वेळ लागणार आहे त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी अखेर सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विवेकानंद नाईक यांना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पंप देण्यास सांगितले आणि काही क्षणात नवीन मोटार पंप उपलब्ध करून दिला त्यामुळे दोडामार्ग रूग्णालय पाणी समस्या दूर झाली आहे.त्यामुळे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रूग्णांचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त केले.
विवेकानंद नाईक यांनी सामाजीक बांधिलकी जपत पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्याची झलक दाखवून दिली. दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयात पाणी पुरवठा करणारी विंधन विहीर गाळ साचून पंप खराब झाला होता. त्यामुळे रूग्णालयात पाणी पुरवठा बंद झाला होता त्यामुळे बांधकाम विभाग तहसीलदार यांचे लक्ष नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी वेधले होते. विधन विहीर साफसफाई करण्यासाठी संबंधित बोअरवेल साफ करणारी मंडळी यांना बोलावून ती साफ करून घेतली नंतर विवेकानंद नाईक यांनी दिलेला मोटार पंप विधन विहीर मध्ये उतरून पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला.
यावेळी उद्योजक विवेकानंद नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण , वैद्यकीय अधिकारी डॉ व ज्ञानेश्वर ऐवळे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष केशव रेडकर, मनोज पार्सेकर, सुनिल गवस आदी उपस्थित होते.