You are currently viewing दागिने चोरी प्रकरणी कर्नाटक येथील एकाला अटक : पोलीस कोठडी

दागिने चोरी प्रकरणी कर्नाटक येथील एकाला अटक : पोलीस कोठडी

कुडाळ

कुडाळ शिवाजीनगर येथील रियाना बंगलेकर या महिलेचे दागिने चोरी प्रकरणी कर्नाटक गांधीगंज येथील हसनी नासिर हुसेन उर्फ इराणी या संशयिताला कुडाळ पोलिसांनी अटक केली असून कुडाळ न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

याप्रकरणी कुडाळ शिवाजीनगर येथील रियाना बंगलेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दि. 10 सप्टेंबर तक्रार दिली होती की, दि.10 सप्टेंबर रोजी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास त्या घराशेजारील कपड्याच्या दुकाना जवळ उभी असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली व तिला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र मागवुन ते मंगळसुत्र 100 रुपयाच्या नोटीत ठेवले. त्यानंतर नोट व मंगळसूत्र पिशवीत ठेवून गाठ बांधली. व पिशवी बंगलेकर यांच्याजवळ दिली व तो व्यक्ती निघून गेला.

बंगलेकर यांनी मंगळसूत्र पिशवीत आहे की नाही हे पाहीले असता मंगळसूत्र सापडून आले नाही. त्यामुळे त्याची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात त्यावेळी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान या प्रकरणाचा तपास कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस डी. डी. माने करीत असुन तक्रारदार बंगलेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी रोहा पोलिसांनी अटक केलेल्या हसनी नासिर हुसेन उर्फ इराणी याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली घेत अटक केली व त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस डी. डी. माने करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा