You are currently viewing सातुळी-बावळाट येथे नदीत बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू…

सातुळी-बावळाट येथे नदीत बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू…

सावंतवाडी

सातुळी-बावळाट येथील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. साहिल उर्फ सगुण जनार्दन राऊळ असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान उशिरा पर्यंत त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे बाबल अल्मेडा पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =