कणकवली
गेल्या कित्येक वर्षांपासून कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्वर मंदिरातील जीर्ण झालेल्या मंदिराच्या जागी 15 मे रोजी पूजा अर्जा करून जीर्णोद्धार करून मोठया थाटमाटात उद्घाटन करण्यात आलेल्या मंदिरात दिवे , मेणबत्त्या लावून प्रथमच ख-या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली.
ग्रामस्थाच्यावतीने घराप्रमाणे मंदिरातही दिवाळी साजरा करण्यात आली.पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ तसेच नवचैतन्य क्रिडा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पिंपळेश्वर मंदिरात भव्य दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. देवाची आरती झाल्यावर पुष्प अभिषेक करण्यात आला.यंदा प्रथमच केलेल्या हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिरातील गाभा-या प्रमाणे मंदिर व परिसरही उजळला होता.त्यामुळे वाडीत आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथमेश गाडे ,आदित्य पाळेकर , रणदिप पाळेकर , संतोष तर्फे , अनिल पाळेकर , ओंमकार कोलते आदिंचे वाडीतील सर्व तरुण मुलाचे सहकार्य लाभल्याचे पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी सांगितले.