You are currently viewing कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्‍वर मंदिरात दीपोत्सव साजरा

कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्‍वर मंदिरात दीपोत्सव साजरा

कणकवली

गेल्या कित्‍येक वर्षांपासून कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्‍वर मंदिरातील जीर्ण झालेल्‍या मंदिराच्‍या जागी 15 मे रोजी पूजा अर्जा करून जीर्णोद्धार करून मोठया थाटमाटात उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या मंदिरात दिवे , मेणबत्त्या लावून प्रथमच ख-या अर्थाने दिवाळी साजरी करण्‍यात आली.
ग्रामस्‍थाच्‍यावतीने घराप्रमाणे मंदिरातही दिवाळी साजरा करण्‍यात आली.पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ तसेच नवचैतन्‍य क्रिडा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पिंपळेश्‍वर मंदिरात भव्य दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. देवाची आरती झाल्यावर पुष्प अभिषेक करण्यात आला.यंदा प्रथमच केलेल्या हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिरातील गाभा-या प्रमाणे मंदिर व परिसरही उजळला होता.त्‍यामुळे वाडीत आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथमेश गाडे ,आदित्‍य पाळेकर , रणदिप पाळेकर , संतोष तर्फे , अनिल पाळेकर , ओंमकार कोलते आदिंचे वाडीतील सर्व तरुण मुलाचे सहकार्य लाभल्‍याचे पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 1 =