You are currently viewing सावंतवाडीत उद्या कार्यकारी अभियंता हटाव आंदोलन – संजय लाड

सावंतवाडीत उद्या कार्यकारी अभियंता हटाव आंदोलन – संजय लाड

रस्त्याच्या दुरावस्थेस बांधकाम जबाबदार असल्याचा आरोप…

सावंतवाडी

दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या सावंतवाडीतील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता याना हटविण्यात यावे, या मागणीसाठी माडखोलचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी २८ तारखेला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीनही तालुक्यांमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण जीव गमवावे लागत आहेत. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार ठरणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता हटवण्यात यावे, या मागणीसाठी आपण आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा