You are currently viewing आयएमए पिं. चिं. भोसरीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला डॉ. माया भालेराव

आयएमए पिं. चिं. भोसरीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला डॉ. माया भालेराव

पिंपरी (प्रतिनिधी – बाबू डिसोजा कुमठेकर) :

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या(आयएमए) पिंपरी- चिंचवड भोसरी- शाखेच्या अध्यक्षपदी डॉ माया भालेराव तर सचिवपदी डॉ सारिका लोणकर व तर खजिनदार म्हणून डॉ मनिषा डोइफोडे यांची नियुक्ती करण्यात आली. चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यात पदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे व आयएमए राज्याचे उपाध्यक्ष डॉ वैजयंती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विश्वस्त डॉ दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, मावळते अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, डॉ सुहास माटे,डॉ विजय सातव,डॉ प्रभाकर बुरूटे,डॉ माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही संघटना 10 वर्षापासून कार्यरत आहे. वेगवेगळया विषयावर वैद्यकीय परिषद व कार्यशाळा आयोजन, अवयवदान, टीबी जनजागृती, महिला स्वास्थ्य उपक्रम, आओ गांव चले असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ भालेराव यांनी यावेळी दिली.

नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे –

डॉ माया भालेराव – (अध्यक्ष)

डॉ सारिका लोणकर-(सचिव)

डॉ मनिषा डोईफोडे -(खजिनदार)

डॉ सुधीर भालेराव- (नियोजित अध्यक्ष)

डॉ ललित कुमार धोका- (उपाध्यक्ष)

डॉ अनिरुद्ध टोणगावकर-( उपाध्यक्ष )

डॉ सुमीत लाड- ( संपादक- स्पंदन )

डॉ ज्योती डेकाते- (महिला डॉक्टर प्रमुख)

डॉ सुहास लुंकड – (सहसचिव)

डॉ दीपाली टोणगावकर (सह खजिनदार )

या कार्यक्रमाचे नियोजन डॉ सुधीर भालेराव आणि डॉ सुहास लुंकड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ वर्षा कुऱ्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सारिका लोणकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 9 =