आमदार नितेश राणे यांची पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्याकडे मागणी
देवगड
नगरसेविका तन्वी चांदोस्कर व देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी जामसंडे वेळवाडी धबधबा पर्यटन दृष्ट्या विकसित व्हावा या संदर्भात आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते.
त्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. देवगड तालुक्यातील जामसंडे येथील पर्यटन विकास प्रकल्प मंजूर करून देवगड जामसंडे शहराच्या पर्यटन वाढीसाठी प्रयत्न व्हावा असा त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
या प्रकल्पासाठी स्थानिक नगसेविका तन्वी चांदोस्कर व देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर विशेष प्रयत्न करत आहेत.