सावंतवाडी :
सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गतील बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या सावंतवाडीतील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता याना हटविण्यात यावे, या मागणीसाठी माडखोलचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी २८ तारखेला येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तीनही तालुक्यांमध्ये असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार ठरणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता हटविण्यात यावे या मागणीसाठी आपण आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच त्या बाबतचे लाड यांनी प्रसिद्धपत्रक दिले आहे.