मालवण
कुंभारमाठ गावातील मालवण- कसाल राज्यमार्ग वर जरीमरी घाटी येथील 1000 मीटरच्या रस्तावर असंख्य खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.दररोज अपघात मालिका सुरू आहे .सदर रस्त्याचे आठ दिवसात योग्य डांबरीकरण न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागला देण्यात आला.
याप्रसंगी सरपंच प्रमोद भोगावकर , ग्रा.प.सदस्य विनोद भोगावकर, युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, ग्रामस्थ दामोदर गवई, योगेश बिळवसकर, घुमडे ग्रामस्थ नंदकुमार वस्त आदी उपस्थित होते.