You are currently viewing इचलकरंजीत युवतींसाठी मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

इचलकरंजीत युवतींसाठी मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथे माहेश्वरी युथ फौंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षांपुढील युवतींसाठी माय आत्मनिर्भर बेटी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लबच्या प्रांगणात दिनांक २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हे शिबीर होणार असून यामध्ये प्रामुख्याने शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे.

सध्याच्या काळात युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण होवून स्व – संरक्षणाबरोबरच मर्दानी खेळाच्या कलेचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे. या उद्देशानेच माहेश्वरी युथ फौंडेशन व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माय आत्मनिर्भर बेटी शिबीर आयोजित कण्यात आले आहे. या शिबीरातंर्गत युवतींना तज्ञ प्रशिक्षकांमार्फत दांडपट्टा, लाठी – काठी, तलवार बाजी असे शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याशिवाय तज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून यामध्ये सामाजिक भान कसे जपावे, सूज्ञ नागरिकाची कर्तव्ये, सामाजिक विकास योगदान अशा विविध महत्वाच्या विषयांवर मौलिक मार्गदर्शन होणार आहे. तरी इच्छुक युवतींनी तातडीने रोटरी क्लब कार्यालयात (मो.९८२२२६९७३३) नाव नोंदणी करुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन माहेश्वरी युथ फौंडेशन व रोटरी क्लबने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा