You are currently viewing परुळेतील सर्व धान्य दुकान मध्ये आनंदाचा शिधा चे वितरणाचा शुभारंभ

परुळेतील सर्व धान्य दुकान मध्ये आनंदाचा शिधा चे वितरणाचा शुभारंभ

वेंगुर्ला :

 

परुळेतील रास्त धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ चे वितरण सुरु करण्यात आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी दिवाळी सणानिमित्ताने रास्त दर धान्य दुकानातून १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. यात १ किलो रवा, १किलो डाळ, १ किलो साखर, १ लीटर तेल अशी त्याची रचना आहे. परुळे गावातील रास्तदर धान्य दुकानातुन उपलब्ध झाले आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश सामंत, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, तसेच संचालक सदस्य, सेल्समन बाबू घोगळें, जयवंत राऊळ यांजबरोबर लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा